अभिनेता संजय दत्त कर्करोगाच्या बातमीनंतर ऑगस्टपासून चर्चेत आला आहे. त्याला मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होतं. आता संजूबाबाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आपल्या नव्या लूकची झलक चाहत्यांना दिली आहे.
हे फोटो शेअर करत त्याने 'अधीरा आणि केजीएफ 2' च्या कामासाठी कंबर कसलेली आहे' असं कॅप्शन दिलं आहे.
संजूबाबाने ब्लॅक टी-शर्ट आणि ब्राऊन पँटमध्ये स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.
संजूबाबाचे हे फोटो त्याची पत्नी मान्यता दत्तने शेअर केले आहेत. त्यावर मान्यताने कॅप्शनमध्ये 'रुक जाना नहीं तुम कहीं हार के ...' हे प्रसिद्ध गाणं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
त्याच्या कर्करोगाच्या निदानानंतर तो सातत्यानं आपल्या कुटुंबियांसोबतचे फोटो शेअर करत आहेत.