बीड : आता मराठवाड्यातील अतिरिक्त ऊसाची तोड होते की हा ऊस जळून खाक होतो अशीच शंका उपस्थित होणाऱ्या घटना मराठवाड्यात घडत आहे. गेल्या काही दिवसांपासून ऊसाला आगीच्या घटना वाढत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये तर यंदाच्या हंगामात तब्बल 500 एकरावरील ऊस जळून खाक झाला आहे. विशेष म्हणजे या सर्व घटना महावितरणने शॉक दिल्याने घडलेल्या आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी माजलगाव तालुक्यातील लोणगाव शिवारात 5 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.