सध्या सगळ्यांचाच व्हेकेशन मूड आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक महिने घरात अडकल्यानंतर आता प्रत्येकालाच मोकळ्या हवेची गरज वाटू लागली आहे. बॉलिवूड कलाकारही व्हेकेशनची मजा घेताना दिसत असून सध्या 'मालदीव' हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं डेस्टिनेशन ठरत आहे.
अनेक कलाकार मालदीवच्या प्रेमात आहेत. दिशा पाटनी, सोनाक्षी सिन्हा, रकुल प्रीत, तापसी या अभिनेत्रींनंतर आता हिना खान मालदीवला पोहोचली आहे.
हिना खान सध्या मालदीवमध्ये धमाल करत आहे.
या संपूर्ण ट्रीपचे फोटो ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत आहे.
हिनानं 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेतून अक्षरा म्हणून स्वत:ची ओळख प्रस्थापित केली आहे.
या मालिकेच्या माध्यमातून तिनं संपूर्ण देशातील प्रेक्षकाच्या मनावर राज्य केलं.
बिग बॉसमध्ये केलेल्या धमाकेदार प्रदर्शनानंतर आता ती अधिकच लोकप्रिय झाली आहे.
सध्या तिचे मालदीवचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.