बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) बर्याचदा सोशल मीडियावर चर्चेत असते. चाहते तिच्या या बोल्ड स्टाईलचे दिवाने आहेत. पण, यावेळी सनी क्यूट स्टाईलमध्ये दिसली आहे. तिने तिची काही फोटो तिच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केली आहेत, ज्यात ती सुंदर ड्रेसमध्ये दिसली आहे. या फोटोंमध्ये सनी एखाद्या राजकुमारी सारखी दिसत आहे.
सनी लिओनीची हे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. तिचे चाहते या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत
सनी लिओनीचा हा लूक खूप वेगळा आहे. यात ती खूप गोंडस आणि सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्यात तिच्या मेकअपने चार चाँद लावले आहेत. तिने खूप हलका मेकअप केला आहे.
2012 मध्ये सनीनं 'जिस्म 2' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
'बॉईज' या मराठी चित्रपटातही तिचं दर्शन घडलं. मात्र एक पहेली लीला, रागिणी एमएमएस, मस्तीजादे, बेईमान लव्ह अशा मादक भूमिकांपासून अभिनेत्री होण्याकडे आता तिचा प्रवास होताना दिसत आहे.