सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं हा एक वेगळाच अनुभव असतो. सूर्य उगवला की आपली धावपळ सुरू होते आणि सूर्य मावळल्यानंतर आपला दिवस समाप्त होतो. मात्र जगात काही ठिकाणी सूर्यास्त होत नाही म्हणजेच तिथे रात्रच होत नाही. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात .
नॉर्वे : नॉर्वे आर्टिक सर्कलमध्ये येतं. याला मध्यरात्रीचा देश म्हणून सुद्धा संबोधलं जातं. मे ते जुलै महिन्यादरम्यान म्हणजेच जवळजवळ 76 दिवस येथे सूर्य मावळत नाही. नॉर्वेमध्ये असंही एक ठिकाण आहे जिथे 2 वर्ष सूर्य दिसतच नाही.
स्वीडन : स्वीडनमध्ये मे ते ऑगस्ट दरम्यान सूर्यास्त होत नाही. येथे 100 दिवस सूर्य मावळत नाही. सूर्य मावळला तरी तो अर्ध्यारात्री परत उगवतो.
फिनलँड : फिनलँडमध्ये अर्ध्यारात्रीसुद्धा तुम्ही सूर्य किरणांचा आनंद घेऊ शकता. या देशात उन्हाळ्यात सलग 73 दिवस सूर्यप्रकाश तुम्हाला मिळू शकतो.
आइसलँड यूरोप : या ठिकाणी 10 मेपासून ते जूलै महिन्याच्या शेवटपर्यंत सूर्यास्त होत नाही.
कॅनडा : कॅनडा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जगातील दूसरा सगळ्यात मोठा देश आहे. येथे उन्हाळ्यात पूर्ण 50 दिवस सूर्यप्रकाश असतो.