IPL 2022 मध्ये सलग आठ सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने दोन सामने जिंकले. पण या संघाला आता एक मोठा झटका बसला आहे. मुंबई इंडियन्सचा मॅचविनर फलंदाज Suryakumar Yadav IPL 2022 मध्ये उर्वरित सामने खेळू शकणार नाहीय.
सूर्यकुमार यादवच्या हाताला दुखापत झालीय. त्यामुळे तो उर्वरित सामने खेळू शकणार नाहीय. सूर्युकमारच्या फोरआर्मला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर गेला आहे.
कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवला दुखापत झाल्याची माहिती दिली. सूर्यकुमार यादवच्या हाताला दुखापत झाली आहे. त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीम बरोबर चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आल आहे.
सूर्यकुमार यादव दुखापतीमुळेच आयपीएलचे पहिले दोन सामने खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत संघाचं मोठ नुकसान झालं होतं. सूर्यकुमार यादवने आयपीएल 2022 मध्ये दमदार फलंदाजी केली आहे. त्याने आठ सामन्यात 43 पेक्षा जास्त सरासरीने 303 धावा केल्या. यात तीन अर्धशतक आहेत.
आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी-20 सामने होणार आहेत. त्यामुळे सूर्यकुमार यादवला विश्रांती दिली असावी. आयपीएल संपल्यानंतर काही मोठ्या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. सूर्यकुमार यादव भारतीय संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे.