ऑस्ट्रेलियाच्या टीमकडून अंतिम मॅचमध्ये तगडी धावसंख्या उभारल्यानंतर, नेमकं मॅच कोण जिंकेल अशी स्थिती होती. परंतु झटपट केएल राहूल बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने काही काळ मैदानात चांगले फटकेबाजी केली.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजी करण्यास आलेल्या सुर्यकुमार यादवने सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात.
तसेच सुर्यकुमार यादवने कमी बॉलमध्ये अर्धशतक झळकवत, सामन्यावर टीम इंडियाची पक्कड असल्याचं प्रेक्षकांना दाखवून दिलं.
विराट कोहलीने कालच्या अंतिम सामन्यात चाहत्यांचं जोरदार मनोरंजन केलं. त्यामुळे मीडियावर त्यांचं अनेकांनी कौतुक केलं आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने लगावले उत्तुंग षटकाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
कालच्या मॅचमध्ये विराट कोहनीने आपलं अर्धशतक झळकावलं, पुढील महिन्यात होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत तो असाचं खेळेल अशी चाहत्यांना आशा आहे.