बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या चित्रपटातील अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. प्रत्येक चित्रपटातून तापसीने स्वत: ला सिध्द केलं आहे. तापसीचा आगामी चित्रपट ‘लूप लपेटा’मधील तिचा लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय.
तापसी पन्नू आता ‘लूप लपेटा’ या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांची मनं जिंकण्यासाठी तयार झाली आहे.
‘लूप लपेटा’ हा एक कॉमेडी-थ्रिलर चित्रपट असणार आहे. 1998 मध्ये रिलीज झालेल्या जर्मन ‘रन लोला रन’ चित्रपटाचा या चित्रपटाचा हा हिंदी रीमेक चित्रपट आहे.
' थप्पड', 'बदला', 'पिंक', ' सांड की आंख','नाम शबाना' अश्या अनेक धमाकेदार चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता ती ‘लूप लपेटा’ या सिनेमासाठी सज्ज झाली आहे.