अभिनेत्री तापसी पन्नू सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच चाहत्यांसाठी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
आता तापसीनं ‘शाब्बास मिथू’च्या सेटवरुन काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिच्या आगामी चित्रपटासाठी तापसी प्रचंड मेहनत घेत आहे. आता नुकतंच तिनं ‘दोबारा’ या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण केलं आहे. आता ती ‘शाब्बास मिथू’ चित्रपटासाठी मेहनत घेतेय.
क्रिकेटची प्रॅक्टिस करताना तिनं हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती पूर्ण क्रिकेट किटसोबत प्रॅक्टिस करताना दिसतेय.
आपल्या कसदार अभिनयानं आणि बोल्ड व्यक्तिमत्वानं सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री तापसी पन्नू तिचा आगामी चित्रपट ‘शाब्बास मिथू’ साठी भरपूर मेहनत घेत आहे.’ थप्पड’, ‘बदला’, ‘पिंक’, ‘ सांड की आंख’,’नाम शबाना’ अश्या अनेक धमाकेदार चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता ती ‘शाब्बास मिथू’ या सिनेमासाठी सज्ज झाली आहे.