मालिकेत माधवी आत्माराम भिडेंची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनालिका जोशी एका एपिसोडसाठी जवळपास 35 हजार रुपये मानधन स्वीकारते. तिची एकूण संपत्ती 10 कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जातंय.
गोकुळधामचे सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे यांची भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर एका एपिसोडसाठी जवळपास 80 हजार रुपये फी घेतात. त्यांची एकूण संपत्ती ही 10 कोटींच्या घरात आहे.
मालिकेत मिस्टर अय्यरची भूमिका साकारणारे अभिनेते तनुज महाशब्दे एका एपिसोडसाठी 65 ते 80 हजार रुपये फी स्वीकारतात. त्यांची एकूण संपत्ती ही 30 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं.
मालिकेत जेठालालचे वडील चंपकलाल जयंतीलाल गडा यांची भूमिका अभिनेते अमित भट्ट साकारतात. त्यांना एका एपिसोडसाठी 70 ते 80 हजार रुपये मानधन मिळतं. त्यांची एकूण संपत्ती ही 16.4 कोटी रुपये इतकी आहे.
'तारक मेहता..'मध्ये पत्रकार पोपटलालची भूमिका श्याम पाठक साकारतोय. या भूमिकेसाठी त्याला 60 हजार रुपये मानधन मिळत असल्याचं कळतंय. श्याम पाठकची एकूण संपत्ती एक कोटी रुपयांच्या घरात आहे.
अभिनेत्री मुनमुन दत्ता यामध्ये बबिता अय्यरची भूमिका साकारते. एका एपिसोडसाठी तिला जवळपास 35 ते 50 हजार रुपये मानधन मिळतं. मुनमुनची एकूण संपत्ती जवळपास 30 कोटी रुपये इतकी आहे.
या मालिकेत जेठालाल चंपकलाल गडाची भूमिका अभिनेते दिलीप जोशी साकारतात. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतं. ते एका एपिसोडसाठी 1.5 लाख रुपये फी घेतता. त्यांची एकूण संपत्ती जवळपास 43 कोटींच्या घरात आहे.