अभिनेत्री तनुश्री दत्ता बॉलिवूडमधील सेकंड इनिंगसाठी सज्ज झाल्याचं वृत्त आहे.
त्यासाठी तिनं तब्बल 15 किलो वजन कमी केलं आहे. वजन कमी केल्यानं तिच्या या ट्रान्सफॉर्मेशनचं कौतुक करण्यात येत आहे.
सोशल मीडियावर तिनं तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर केले आहेत.
ती सध्या सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते. तिनं एक फोटो शेअर करत आपण बॉलिवूडमध्ये पुनरागमनाचा विचार करत असल्याचं सांगितलं आहे.
तनुश्रीने हिंदी चित्रपटांसोबतच तामिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
तिनं मिस इंडियाचा किताबही जिंकला होता.