Tata Punch गाडीमध्ये मोठा बदल, आता ग्राहकांना फायदा होणार त्यासोबत पैशांची बचत, जाणून घ्या
अलीकडेच टाटा मोटर्सने लोकप्रिय एसयूव्ही टाटा पंचचे अपडेट वर्जन सादर केले आहे. नवीन BS6 फेज 2 नियम लक्षात घेऊन काही नवीन बदल करण्यात आले आहेत.

अलीकडेच टाटा मोटर्सने लोकप्रिय एसयूव्ही टाटा पंचचे अपडेट वर्जन सादर केलं आहे. नवीन BS6 फेज 2 नियम लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अपडेट मॉडेलसह एसयूव्हीचे मायलेज पूर्वीपेक्षा चांगले झाले आहे. पंच SUV ची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे.
- अलीकडेच टाटा मोटर्सने लोकप्रिय एसयूव्ही टाटा पंचचे अपडेट वर्जन सादर केलं आहे. नवीन BS6 फेज 2 नियम लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अपडेट मॉडेलसह एसयूव्हीचे मायलेज पूर्वीपेक्षा चांगले झाले आहे. पंच SUV ची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे.
- टाटा पंचचे नवीन मॉडेल आयडल स्टॉप स्टार्ट वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आले आहे, जे चांगले रोड मायलेज देते. रिपोर्ट्सनुसार, आधी त्याचे मायलेज 18.97 किमी/ली होते, जे आता 20.10 किमी/लीपर्यंत वाढले आहे. विशेष म्हणजे ग्लोबल NCAP 5 स्टार सुरक्षा रेटिंग असलेली ही देशातील सर्वात सुरक्षित कार आहे.
- टाटा पंचच्या फीचरबद्दल बोलायचं झालं तर, ड्युअल-फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, कॉर्नरिंग स्टॅबिलिटी कंट्रोल, ISOFIX चाइल्ड सीट, सेगमेंट-फर्स्ट ‘ब्रेक स्वे कंट्रोल’ यासारखे सेफ्टी फीचर्स पंचमध्ये उपलब्ध असतील. याशिवाय सेमी-डिजिटल कन्सोल आणि 7 इंची इन्फोटेनमेंट सिस्टीम सारखे फीचर्स देखील उपलब्ध असतील.
- टाटा पंचमध्ये Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, iRA कनेक्टेड कार टेक, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हॉइस रेकग्निशन, स्मार्ट कीलेस एंट्री, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, ऑटो-फोल्डिंग पॉवर-ऑपरेटेड ORVM, क्रूझ कंट्रोल यांसारखी अनेक फीचर्स मिळतील.
- बाजारात ही कार चांगल्या मायलेजमुळे ग्राहकांना खूप आवडू शकते.