प्रत्येक घरात चहाला महत्त्व दिले जाते आणि दररोज घरात बनवल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी चहा हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. पण काही लोकांना चहा सोबत काहीतरी पदार्थ खाण्याची इच्छाही असते. जसे, रिकाम्या पोटी नुसता चहा प्यायल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते, तसेच आपण चहासोबत खात असलेल्या चुकीच्या पदार्थांमुळेदेखील शरीराला हानी पोहचू शकते. चला तर अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊया, ज्याचे चहासोबत सेवन केल्याने शरीराला हानी होऊ शकते.
बहुतेक लोक चहासोबत बेसन पीठात बनवलेले, तळलेले पदार्थ खातात. चहाबरोबर बेसनयुक्त पदार्थांचे सेवन करणे अतिशय धोकादायक आहे. यामुळे आपली पाचन शक्ती कमकुवत होते. याशिवाय शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होते.
चहा प्यायल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये. आपल्या घरातील वडीलधारी मंडळीही आपल्याला असे करण्यास प्रतिबंध करतात. कारण चहा पिल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे आपल्या पोटात अनेक समस्या उद्भवतात. चहा घेतल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात.
आपल्यापैकी बरेचजण चहाची चव वाढवण्यासाठी त्यात लिंबू किंवा लिंबाचा रस मिसळतात. परंतु, हे मिश्रण आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. म्हणून चहानंतर कोणतीही आंबट गोष्ट खाऊ नये.
चहा प्यायल्यानंतर लगेच अशा गोष्टी खाऊ नयेत, ज्यात हळदीचे प्रमाण जास्त असेल. कारण, चहा आणि हळदीमधील रासायनिक घटक एकमेकांशी मेळ साधून आपल्या पाचन तंत्राला बरेच नुकसान करतात आणि पोटास हानी पोहोचवू शकणारे घटक तयार करतात.
चहाबरोबर किंवा नंतर कच्च्या गोष्टी खाऊ नयेत. यामुळे आपल्या पोट आणि आरोग्यास हानी पोहोचू शकते. चहा, अंकुरलेले धान्य आणि उकडलेले अंडे असलेले सलाड खाणे टाळले पाहिजे.