दुसऱ्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्या स्वप्नांना आपलं स्वप्न समजणारे फार कमी लोक आहेत. मात्र एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्याचं स्वप्न आपलंच स्वप्न समजत असेल तर ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.
ग्रीसच्या एका अॅथलिटनं एक धमाल गोष्ट करुन दाखवली आहे. Marios Giannakou याने आपल्या दिव्यांग विद्यार्थिनीचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलं आहे. त्यानं एलिफथेरिया नावाच्या विद्यार्थिनीला आपल्या पाठीवर बसवून माऊंट ओलिंपवर फेरफटका मारून आणलं आहे. कारण माऊंट ओलिंपवर जाण्याचं एलिफथेरियाचं स्वप्न होतं.
सप्टेंबर महिन्यात मॅरिओस हे 22 वर्षीय एलिफथेरियाला भेटले. याच भेटी दरम्यान तिनं माउंट ओलिंपवर जाण्याची इच्छा मॅरिओसला सांगितली. थोड्याच दिवसात तिचं स्वप्न पूर्णही झालं.
मॅरिओसनं इन्स्टाग्रामवर आपण माऊंट ओलिंपवर जाणार असल्याची माहिती दिली होती. सोबतच त्यांनी एलिफथेरिया सुद्धा माऊंट ओलिंपवर जाणारी पहिली महिला असल्याचंही सांगितलं होते.
या प्रवासात मॅरिओसनं आपल्या पाठीवर एक बॅग घेतली आणि त्यात एलिफथेरियाला बसवलं. लागणाऱ्या सगळ्या महत्वाच्या वस्तू घेऊन तिचं स्वप्न त्यानं पूर्ण केलं.