Marathi News Photo gallery Team india odi test captain rohit sharma luxury lifestyle net worth cars family house ritika sajdeh
Rohit Sharma Lifestyle: रोहित टीम इंडियाचा नवीन बॉस, 200 कोटीची संपत्ती, वरळीतील फ्लॅटची किंमक ऐकून विस्फारतील डोळे
Rohit Sharma Lifestyle: वनडे, टी-20 पाठोपाठ कसोटी संघाची धुराही रोहित शर्माकडे सोपवली आहे. रोहित शर्मा आता तिन्ही फॉर्मेटमध्ये भारतीय संघाचा नवीन कर्णधार बनला आहे.
1 / 10
BCCI ने श्रीलंके विरुद्ध होणाऱ्या तीन टी-20 आणि दोन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे.
2 / 10
वनडे, टी-20 पाठोपाठ कसोटी संघाची धुराही रोहित शर्माकडे सोपवली आहे. रोहित शर्मा आता तिन्ही फॉर्मेटमध्ये भारतीय संघाचा नवीन कर्णधार बनला आहे.
3 / 10
वनडेमध्ये तीन वेळा डबल सेंच्युरी झळकवणारा रोहित शर्मा जगातील एकमेव फलंदाज आहे. रोहितने 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्यात 264 धावा केल्या होत्या. हा सुद्धा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
4 / 10
रोहित शर्माने मैदानाबाहेरही आपल्या लाइफ स्टाइलने लाखो चाहते बनवले आहेत. रोहितला महागड्या गाड्यांचा शॉक आहे. त्याशिवाय तो कुटुंबाबरोबरही जास्त वेळ घालवतो. त्याचे फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
5 / 10
सध्याच्या घडीला रोहित शर्माची एकूण संपत्ती 200 कोटींपेक्षा जास्त आहे. मागच्यावर्षी 2021 मध्ये रोहित शर्माची संपत्ती 160 कोटीपेक्षा जास्त होती. रोहितला IPL फ्रेंचायजी मुंबई इंडियन्सने 16 कोटी रुपयांना रिटेन केलं आहे.
6 / 10
रोहित शर्माकडे BMW 5M सीरीजची कार आहे. या कारची किंमत 1.6 कोटीपेक्षा जास्त आहे. रोहितकडे मर्सिडीज, ऑडी, स्कोडा लॉरा, टोयोटा फॉर्च्यून अशा महागड्या गाड्या आहेत.
7 / 10
मुंबईच्या वरळी भागात रोहित शर्माचा आलिशान फ्लॅट आहे. अहुजा टॉवर बिल्डिंगच्या 29 व्या मजल्यावर तो राहतो. या फ्लॅटची किंमत 30 कोटी रुपये आहे. रोहितच्या घरातून अरबी समुद्र दिसतो. आज तकने हे वृत्त दिलं आहे.
8 / 10
इंग्लंडची गायिका सोफिया हयात सोबत रोहितचं अफेयर होतं. पण रीतिका सजदेह बरोबर रोहितने लग्न केलं. 13 डिसेंबर 2015 रोजी लग्न झालं. रोहितला एक मुलगी आहे. तिचं नाव समायरा शर्मा आहे.
9 / 10
रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाच वेळा जेतेपद पटाकवलं आहे. यंदाही रोहित शर्माच मुंबईचा कर्णधार आहे. फ्रेंचायजीने त्याला रिटेन केलं आहे.
10 / 10
क्रिकेट बरोबरच रोहित शर्मा सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल जाणून घेण्यातही चाहत्यांना तितकाच रस आहे.