लिस्टमध्ये पाचव्या स्थानी आहे भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant).पंतने 11 सामन्यांत 22 डावांमध्ये 40 बळी घेतले आहेत. ज्यात 35 झेल आणि 5 स्टंपिंग आहेत. सर्वाधिक स्टपिंग हे पंतच्या नावारच आहेत.
"मित्रांनो, आपला देश निराशेतून जात आहे. त्यामुळे मला खूप वाईट वाटत आहे. मी अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना कोरोनामुळे गमावताना पाहिलंय. त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे आपल्यात नाहीत मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो", असं रिषभ म्हणाला.
"लढाई जिंकण्यासाठी सांघिक कामिगिरी महत्वाची असते, हे मी क्रिकेटमधून शिकलो आहे. वर्षभरापासून अविरत न थकता कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना योद्धांचे आभार मानतो. या अशा अडचणीच्या परिस्थितीत देशसेवा करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे", असं पंतने नमूद केलं.
"या वैश्विक महामारीचा सामना करण्यासाठी मी हेमकुंट या सेवाभावी संस्थेला आर्थिक मदत करत आहे. या द्वारे ही संस्था रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन बेड्स, कोरोना किट यासारख्या वस्तु गरजूंना पुरवेल. ग्रामीण आणि निमशहरी भागात शहरांच्या तुलनेत वैद्यकीय सेवेचा अभाव असतो. त्यामुळे खेड्यातील आणि निमशहरी लोकांना मी मदत करणार आहे" असं रिषभने स्पष्ट केलं.
श्रेयस अय्यर संघात परतला, ऋषभ पंतचं कर्णधारपद धोक्यात ?