Photo | …तर तेजस्वी यादव बिहारचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरणार, पवारांचा तो विक्रम मोडित काढणार?
प्रफुल्लकुमार महंतो वयाच्या 34 व्या वर्षी आसामचे मुख्यमंत्री झाले होते. नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला 38 व्या वर्षी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव 38 व्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते.
Follow us
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 15 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या नितीशकुमार यांच्या विरोधात राजदचे युवा नेते तेजस्वी यादव यांनी महाआघाडीच्या प्रचाराची धुरा सांभाळली. तेजस्वी यादव यांच्या झंझावाती प्रचारामुळे महाआघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
बिहारच्या सर्वात तरुण मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा विक्रम सतिश प्रसाद सिंह यांच्या नावावर आहे. सतिश प्रसाद सिंह जानेवारी 1968 मध्ये वयाच्या 32 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते. डॉ.जगन्नाथ मिश्रा एप्रिल 1975 मध्ये 38 व्या वर्षी बिहारचे मुख्यमंत्री झाले होते. एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर तेजस्वी यादव देशातले सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरतील.
प्रफुल्लकुमार महंतो वयाच्या 34 व्या वर्षी आसामचे मुख्यमंत्री झाले होते. नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला 38 व्या वर्षी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव 38 व्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते.
विविध संस्थांचे एक्झिट पोल्स जर एक्झॅट ठरले तर तेजस्वी यादव आपल्या मुरब्बी राजकारणाची झलक दाखवण्याबरोबरच अनेक नेत्यांचे रेकॉर्ड मोडित काढतील, हे नक्की…