मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमामात अॅक्टिव्ह असते.
आता तिनं एक मस्त आणि हॉट फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तेजस्विनी या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.महत्वाचं म्हणजे तिनं हे शूट तिच्या घरातच केलं आहे. तिच्याच रुममध्ये आणि तिच्याच बेडवर केलेलं हे सुंदर फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधत आहे.
'Delete that old version of me in your head. It Expired ??' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तेजस्विनी अभिनय आणि सौंदर्यासोबतच तिच्या फॅशन ब्रॅन्डमुळेसुद्धा चर्चेत असते. 'तेजाज्ञा'या ब्रॅन्डचा चांगलाच दबदबा पाहायला मिळतो. या ब्रॅन्डचे एकापेक्षा एक कपडे सध्या ट्रेंडमध्ये आहेत.