डिसेंबर महिना अर्धा लोटला आहे. उशिराने हा होईना पण मुंबई आणि उपनगरात थंडीला सुरुवात झाली आहे. हवामानात गारवा जाणवू लागला आहे.
नाशिक जिल्ह्यात थंडी वाढली आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये गेले दोन दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर बऱ्याच भागांमध्ये तापमानात घट झाली आहे.
मुंबईसह उपनगरातील पारा देखील खाली आला असून मुंबईकर गुलाबी थंडीचा आनंद घेत असल्याचं सर्वत्र चित्र आहे.
ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातही निसर्गाचं सौंदर्य फुलून आले आहे. येथे सर्व ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे.
काही अंतरावर नजर जाताच सर्वत्र धुक्याची सुंदर आणि मनमोहक चादर पसरल्याचं दिसून येतं.
हिरव्या झाडांमध्ये पसरलेलं हे धुकं पृथ्वीवरील स्वर्गासारखं भासत आहे.
पहाटेच्या थंडगार धुक्याच्या वातावरणाचा आणि या सौंदर्य पर्वणीचा बच्चे कंपनी आणि नागरिक आनंद लुटत आहेत.