गेले अनेक दिवस गंगा नदीत सापडत असलेल्या मृतदेहांमुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहेत.
परिणामी या भीतीमुळे मासेविक्रीवर मोठा परिणाम होताना दिसतोय.
बिहारमधील एक मच्छीमार म्हणाला, ‘आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.’
मासे विक्रीसाठी उपलब्ध असलेला वेळ 2 तास आहे तो वाढवण्यात यावा अशी मागणी आता मत्स्यविक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे आता कोणीही खरेदी न केलेले मासे परत नदीत टाकण्यात येत आहेत.