शेतकरी दुभत्या जनावरांना कुटुंबातील सदस्या प्रमाणे जपत असतात.गायीसाठीचा खुराक चारा सगळ्याची पुर्तता करण्यासाठी दिवसरात्र शेतकरी राबत असतो.
माढ्यातील गणेश सांळुखे या शेतकऱ्याच्या गाईने एकाच वेळेस चक्क दोन वासरांना जन्म दिलाय. त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण अत्यंत आनंदी आहे. गाईचं भागात लोक कौतुक करीत आहेत. तसेच असा चमत्कार क्वचित पाहायला मिळतो.
यामुळे माढ्यासह परिसरातील पशुपालक शेतकरी वर्गामध्ये कुतूहल निर्माण झालय.
गाईने जन्म दिलेल्या दोन्ही वासरांची प्रकृती सदृढ आहे.सोलापूर मार्गावर ग्रीन सिटी पार्कच्या नजीक गणेश साळुंखे यांची शेती असुन सांळुखे यांच्या गाईला एकाच वेळेस दोन वासरु झालेत.
यामुळे सांळुखे कुटूंबीय देखील आनंदुन गेले आहे. पेढे वाटून त्यांनी आनंद साजरा केला.
मागील 5 वर्षापुर्वी 12 हजार रुपयाला ही गाई शेतकरी सांळुखे यांनी खरेदी केली होती.