'गहराईयाँ' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेकांच्या तोंडात त्यांचं नाव आहे, कारण अनेकांच्या पसंतीला चित्रपट पडला आहे. त्याचं नेमक शुटिंग कुठे झालं यावर आपण चर्चा करणार आहोत.
'गहराईयाँ' चित्रपटात दीपिका पुदकोन, सिध्दार्थ चतुर्वेदी अनन्या पांडे आणि धैर्य करवा हे मुख्य भुमिकेत आहेत. त्या चित्रपटातल्या अनेक गोष्टी तुम्हाला विचार करायला भाग पाडतात, असं चाहत्याचं म्हणणं आहे.
ज्या परिसरात शुटिंग सुरू होतं, तिथं सट्टीच्या काळात सगळ्या कलाकारांनी मजा मस्ती केल्याचं ऐकायला मिळतंय. कारण ते ठिकाणचं तसं होतं.
चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांना हे ठिकाण अलिबागमध्ये असल्याचं वाटतं होतं. पंरतु हे ठिकणं अलिबागमधील नसून ते गोव्यातील आहे. जिथं चित्रपट शुट झाला तिथल्या हॉटेलचं नाव आहिल्या असल्याचं समजतंय.
समुद्र किनारी असणा-या घरात नऊ खोल्या आहेत, त्यासोबत स्विमिंग पूल आणि मैदान देखील आहे. गोव्यातली हॉटेलमधील एका रूमची किंमत वेगवेगळी आहे. पण अहिल्या हॉटेलात गेल्यानंतर तुम्हाला 21 हजार रूपयांपासून 33 हजारापर्यंत रूम मिळू शकते. ही फक्त एका रात्रीची किंमत आहे.
सोशल मीडियावरती आहिल्या हॉटेलच्या सगळ्या बाजूचे फोटो तुम्हाला पाहायला मिळतील.
हॉटेलच्या परिसरात एकदम शांतता असते. तसेच तिथं गेल्यानंतर तुमचं वैयक्तिक आयुष्य जगता येतंय, तसेच तुम्हाला तिथून समुद्रात मासे उड्या मारताना देखील दिसतात.