Photo : पपईची काढणी नव्हे तर रोटाव्हेटरने मोडणी, शेतकरी हताश
जालना: निसर्गाशी दोन हात करीत शेतकऱ्यांनी पिकांची जोपासणा केली मात्र, उत्पन्न पदरात पडेपर्यंत काही खरे नाही. याचा प्रत्यय भोकरदण तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव येथील शेतकऱ्याने उचललेल्या पावलावरुन लक्षात येईल. वर्षभर रात्रीचा दिवस करुन त्यांना पपई बागेची जोपासणा केली. महागडी औषधे आणि होत असलेल्या खर्चाचा विचार न करता पाण्यासारखा पैसाही खर्च केला मात्र, ऐन तोडणीच्या दरम्यान पपईला कवडीमोल दर मिळत आहे. 3 ते 4 रुपयांनी विक्री केल्यावर झालेला खर्चही पदरी पडणार नाही म्हणून शेतकऱ्याने उभ्या पपई पिकामध्ये रोटाव्हेटर घालून त्याची मोडणी केली आहे. वाहतूक आणि काढणीचा जक खर्च निघत नाही तर पीक घेऊनही काय उपयोग म्हणत सुनील देशमुख यांनी मोडणी केली आहे.
Most Read Stories