Photo Gallery : होळीची चाहूल देणारा पळस भर उन्हामध्ये भगव्या रंगाने बहरला, काय आहे महत्व?
नांदेड : सध्या उन्हाच्या झळा अधिकच तीव्र होत आहेत. फाल्गुन महिना सुरु झाला की शेतशिवारात होळीची अर्थात उन्हाळ्याची चाहूल देणारा पळस भगव्या रंगाने बहरून जातो. सध्या असेच चित्र शेतशिवारामध्ये दिसू लागले आहे. रानावनात उन्हाचे चटके पिऊन बहरलेला पळस सध्या मानवाच लक्ष वेधून घेतोय. आजही आधुनिकतेच्या काळात देखील होळी सणाला या पळसाच्या फुलांपासून केसरी रंग तयार करण्याची प्रथा ग्रामीण भागात टिकून आहे. पळसांच्या या फुलांचा नैसर्गिकरित्या रंग बनवण्यासाठी अनेक जण वापर करत असतात.
Non Stop LIVE Update
Most Read Stories