विराट कोहली वडील आणि अनुष्का शर्मा आई बनली आहे. कोहलीनं सांगितलं की 11 जानेवारीला अनुष्कानं एका मुलीला जन्म दिलाय. सोबतच दोघांची प्रकृती ठीक असल्याचं देखिल त्यानं सांगितलं. आत्ता त्यांना प्रायव्हसीची गरज आहे. रिपोर्स नुसार, अनुष्काची प्रसुती मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात झाली. तर कोहलीला मुलगी झाल्यानं चाहते खूश आहेत. तर कोहलीच्या आधीही बऱ्याच भारतीय क्रिकेटर्सला मुली झाल्या आहेत. चला जाणून घेऊया कोण क्रिकेटपटू आहेत ज्यांचं पहिलं बाळ मुलगी आहे.