शेतीसाठी ट्रॅक्टर अधिक वापरले जातात, त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचं अधिक महत्त्व माहित आहे. आतापर्यंत कुणी विचार सुद्धा केला नसेल की ट्रॅक्टरचं पुढचं टायर लहान का असतं.
ट्रॅक्टर शेतीच्या कामासाठी वापरला जाऊ लागला, तेव्हापासून शेतीची काम अगदी जलद होत आहेत. शेतीच्या प्रत्येक कामासाठी वेगळा ट्रॅक्टर वापरणारे सुद्धा आहेत.
प्रत्येक गाडीचे शक्यतो सारखे असतात. पण ट्रॅक्टरचे टायर बरोबर ठेऊ शकत नाही त्याचं एक कारण आहे. चिखलात किंवा किचडमध्ये ट्रॅक्टर फसण्याची शक्यता अधिक असते. तेव्हा छोट्या टायरांची ट्रॅक्टर अधिक मदत होते. तिथं ट्रॅक्टर सहजतेने चालतो.
ट्रॅक्टरच्या मोठमोठ्या टायरात तयार केलेल्या भेगा मातीला चांगली घट्ट पकडतात. त्यामुळे ट्रॅक्टर सहजतेने पुढे सरकतात.
समजा ट्रॅक्टरला मोठे टायर लावले तर ट्रॅक्टर वळवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होईल, त्यामुळे ट्रॅक्टरला पुढे छोटे टायर असतात. तसेच मागच्या बाजूला मोठे टायर असल्यामुळे ट्रॅक्टर जड सामान घेऊन जात असताना कुचमत नाही.