Photo : कोल्हापूरातील द्राक्ष महोत्सवाचा थेट ग्राहकांना लाभ, संकटावर मात करुन द्राक्षांचा गोडवा कायम
कोल्हापूर : द्राक्ष बागा बहरात असतानाच निसर्गाची अवकृपा झाली आणि एका मागून एक संकटे ही द्राक्ष उत्पादकांसमोर उभी ठाकली होती. अखेर संकटावर मात करुन द्राक्ष ही बाजारपेठेत दाखल झाली आहेत. शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने कोल्हापूर शहरामध्ये द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी-पणन विभाग कोल्हापूर आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव भरला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. गतवर्षी सुरु झालेल्या या महोत्सवात यंदाही सातत्य राहिलेले आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना एक ना अनेक जातींच्या द्राक्षांची खरेदी करता आली तर महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही अधिकचा दर मिळाला.
Non Stop LIVE Update
Most Read Stories