जॅग्वार लँड रोव्हरने आपल्या SUV कारसाठी Nvidia टेक्नॉलॉजीसोबत भागीदारी केली आहे. Nvidia ही सिलिकॉन आर्टिफिशियल इंटेलीजेंस कंपनी आहे. Nvidia लॅपटॉपमध्ये ग्राफिक्स कार्ड तयार करते, जे गेमिंगचा एक नवीन एक्सपीरियंस देते.
ही कंपनी जॅग्वारसाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यास मदत करेल. जो ऑटोमेकर आपल्या SUV कारमध्ये वापरेल. ही कार 2025 किंवा त्यानंतर लॉन्च केली जाणार आहे.
ही एक प्रकारे पार्टनरशिप आहे. ज्याचा उद्देश नेक्स्ट जनरेशन ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग सिस्टम प्लस विकसित करणे आहे.
जॅग्वार लँड रोव्हरने सांगितले की याला 2025 पासून सुरूवात होईल आणि या अंतर्गत Nvidia ड्राइव्ह सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म सर्व जॅग्वार आणि लँड रोव्हर SUV मध्ये असेल.
जॅग्वार लँड रोव्हरची प्लान एनव्हीडिया तंत्रज्ञान वापरून सिम्युलेशनमध्ये वापरली जाईल. मात्र, या तंत्रज्ञानासह कोणत्या कारची प्रथम चाचणी केली जाईल, हे कंपनीने अद्याप सांगितलेले नाही.