कर्नल पृथ्वीपालसिंग गिल यांनी आज आयुष्याची 100 वर्षे पूर्ण केली आहेत.
भारतीय नेव्ही, हवाई दल आणि सैन्यात सेवा देणारे ते एकमेव अधिकारी आहेत. महत्वाचं म्हणजे कर्नल पृथ्वीपालसिंग गिल हे त्यांच्या कुटुंबाच्या संमतीशिवाय रॉयल इंडियन नेव्हीमध्ये दाखल झाले होते.
त्यांची कराचीमध्ये पायलट अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. लेफ्टनंट जनरल के जे सिंह यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली.
काही काळानंतर कर्नल पृथ्वीपालसिंग गिल यांची भारतीय नौदलात बदली झाली, जिथे त्यांनी खाण स्विपिंग जहाजावर काम केलं.
कर्नल पृथ्वीपाल सिंग यांची सैन्यात बदली झाली, त्यांनी मणिपूरमधील आसाम रायफल्स क्षेत्रातही काम केलं.
आज जन्मदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.