वंदेभारत स्लिपर कोचचे दर्शन ‘याची देही याची डोळा,देखिला आनंदाचा सुख सोहळा’!
वंदेभारत एक्सप्रेसच्या स्लिपर कोचच्या प्रोटोटाईपची पाहणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली आहे. वंदेभारत स्लिपर कोच अत्याधुनिक असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक फिचर्सचा यात समावेश करण्यात आला आहे. नवा प्रोटोटाईप BEML कंपनीने तयार केला आहे. या कोचमध्ये 16 डबे असून दिव्यांग प्रवाशांसाठी देखील सोयी आणि सुविधा निर्माण केलेल्या आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदेभारतच्या नव्या स्लिपर कोचची आज पाहणी केली. या स्लिपर कोचला कोणत्या मार्गावर चालविणार आहेत याचा उलगडा झाला नसला तरी मुंबई सेंट्रल ते दिल्ली किंवा अन्य राजधानीच्या मार्गावर हा स्लिपर कोच धावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Most Read Stories