हत्येच्या विळख्यात अडकलेलं गाव,7 खून, 542 दिवस अन् वाढणारी भिती; थरकाप उडवणाऱ्या वेब सीरिजला तुफान प्रतिसाद
वेब सीरिज म्हटलं की ती शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी हवी आणि त्यात जर ती थ्रीलर असेल तर त्यात सस्पेन्स हा असलाच पाहिजे अशी प्रत्येक प्रेक्षकांची इच्छा असते. अशीच एक वेब सीरिज सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालतेय. ती म्हणजे 'मानवत मर्डर्स.
1 / 9
शेवटपर्यंत खिळवून सस्पेन्स, थ्रीलर अशी एक वेब सीरिज सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालतेय. ती म्हणजे 'मानवत मर्डर्स;
2 / 9
'मानवत मर्डर' मध्ये महिला आणि मुलींची हत्या होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडतात. खुन्याला पकडण्यासाठी एक वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात येतो.
3 / 9
पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आशुतोष गोवारीकर यांनी साकारली आहे.
4 / 9
गावात एकापाठोपाठ होणाऱ्या हत्यांचं कोडं उलगडण्यासाठी तब्बल 542 दिवस लागले.
5 / 9
आशुतोष गोवारीकर यांनी साकारलेली भूमिका ही सत्य घटनेतील वरिष्ठ पोलीस अधिकारी रमाकांत कुलकर्णी यांची आहे.रमाकांत कुलकर्णी यांनी या हत्याकांडावर ‘फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राईम’ हे पुस्तकही लिहीलं आहे. आणि याच पुस्तकावर ही वेब सीरिज आधारलेली आहे.
6 / 9
या सस्पेन्स थ्रिलर क्राईम सीरिजचं पार्श्वसंगीत म्हणजे या सीरिजचा युसपी पॉईंट आहे. त्यामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत गुंतवून राहतात.
7 / 9
सोनाली कुलकर्णीने रुक्मिणी बारहाटे ही भूमिका साकारली आहे.
8 / 9
तर, सई ताम्हणकरने समिंद्री उत्तम साकारेली भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली आहे.
9 / 9
ही सीरिज जसजशी पुढे सरकते, तसतसा सस्पेन्स आणि थ्रिलर अधिक वाढत जाते. ही सीरिज सध्या सोनी लिव्हवर सुरु आहे