Safest Car : भारतातील सर्वात सुरक्षित कार, 5 स्टार रेटिंगसह सेफ ड्रायव्हिंगची देतात हमी
Safest Cars in India : भारतात अनेक ऑटो कंपन्यांच्या गाड्या आहेत. काही गाड्या स्वस्त तर काही गाड्या महाग आहेत. पण असं असलं तरी सुरक्षेची तडजोड करणं महागात पडू शकतं. आज आम्ही तुम्हाला पाच सुरक्षित कारबाबत सांगणार आहोत.
Follow us
Volkswagen Virtus : या गाडीला ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी पाच स्टार मिळाले आहेत. वर्टसने प्रौढ सुरक्षेत 34 पैकी 29.71 गुण आणि लहान मुलांच्या सुरक्षेत 49 पैकी 42 गुण मिळवले आहेत. (फोटो: Volkswagen)
Skoda Slavia : सुरक्षेच्या दृष्टीने स्कोडा स्लाविया सेडान मॉडेलही जबरदस्त आहे. ग्लोबल एनसीपीए क्रॅश चाचणी प्रौढ सुरक्षेसाठई 34 पैकी 29.71 गुण आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी 49 पैकी 42 गुण मिळाले आहे. (फोटो: Skoda)
Volkswagen Taigun : या एसयुव्हीला प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी पाच स्टार मिळाले आहे. ताइगुन भारतातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे. (फोटो: Volkswagen)
Skoda Kushaq : स्कोडा कॉम्पॅक्ट एसयुव्ही ताइगुनप्रमाणे ग्लोबल एनसीपीए क्रॅश चाचणीत पाच स्टार मिळाले आहेत. प्रौढ आणि लहान मुलांसाठी ही सुरक्षित कार आहे. (फोटो: Skoda)
Mahindra Scorpio-N : स्कॉर्पियो एन एसयुव्हीला सर्वात जास्त सेफ्टी स्कोअर मिळाला आहे. ग्लोबल एनसीपीए टेस्टमध्ये 58.18 गुण मिळाले आहेत. ऑक्युपेंट प्रोटेक्शन टेस्टमध्ये पाच स्टार मिळाले आहे. पण लहान मुलांच्या सुरक्षेसाठी फक्त तीन गुण मिळाले आहे. (फोटो – Mahindra)