एका अभ्यासानुसार, संगणक, लॅपटॉप आणि मोबाइल स्क्रीनवर जास्त वेळ घालवणे तुमच्या डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. डोळे निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आणि सकस आहार आवश्यक आहे. यासाठी तुम्ही फळे आणि भाज्यांचे रस पिऊ शकता.
नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक खनिजांसह अमीनो ॲसिड मुबलक प्रमाणात असते. हे डोळ्यांच्या प्रोटेक्टिव्ह टिश्यूजना सुधारण्यास मदत करते.
डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी संत्र्याचा रस सेवन करणे फायदेशीर ठरते. संत्रं हे व्हिटॅमिन सी च्या मुख्य स्त्रोतांपैकी एक आहे. हा रस प्यायल्याने मोतीबिंदू होण्याचा धोका कमी होतो.
हिरव्या पालेभाज्या अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत असतात. जे आपल्या डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. यात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असते, जे डोळ्यांवरील हानिकारक किरणांचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात.
डोळ्यांना आवश्यक असलेली बहुतेक पोषक तत्वं टोमॅटोच्या रसामध्ये असतात. टोमॅटोमध्ये असलेले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशिअम यांसारख्या पोषक तत्वांमुळे दृष्टी वाढण्यास मदत होते.