‘हे’ धोकादायक वेलनेस ट्रेंड्स फॉलो कराल, तर पस्तावाल
निरोगी राहण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मची मदत घेणे चांगले असते, पण काही ट्रेंड असे जे फॉलो केल्यास नुकसानकारक ठरू शकते. येथे आपण दातांसंबंधीच्या उपायांबद्दल सांगत आहोत. कोणते घरगुती उपाय दातांना नुकसान पोहोचवू शकतात, ते जाणून घेऊया.
1 / 5
आपले शरीर निरोगी रहावे यासाठी काही युक्त्यांद्वारे शरीराची काळजी घेणे चांगले आहे, परंतु प्रत्येक पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी त्याचे फायदे व तोटे जाणून घेणे आवश्यक आहे. एका बातमीनुसार, एका डेंटिस्टने काही असे ट्रेंड सांगितले आहेत, जे फॉलो केल्याने आपल्या दातांचे मोठे नुकसान होऊ शकते.
2 / 5
व्हिनेगरचा वापर : डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. मात्र व्हिनेगर रोज प्यायल्याने दातांच्या समस्या निर्माण होतात. व्हिनेगरमध्ये ॲसिड असते, त्यामुळे त्याचा रोज वापर केल्यास दातांवर पिवळसरपणा येतो.
3 / 5
ऑईल पुलिंग : तेलाच्या गुळण्या केल्याने दात आणि तोंडाचे आरोग्य चांगले राहते, असे म्हणतात. ही पद्धत प्राचीन काळापासून अवलंबली जात आहे, मात्र ती फायदेशीर असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे दातांमध्ये कॅव्हिटीसुद्धा निर्माण होऊ शकते.
4 / 5
लिंबू पाणी : ज्यूस किंवा लिंबूपाणी यांसारखी पेय जास्त प्रमाणात सेवन केल्यास दातांमध्ये इनॅमलची समस्या निर्माण होऊ शकते. डॉक्टरांच्या मते, यामध्ये व्हिटॅमिन सी असते जे आरोग्यासाठी आवश्यक असते, मात्र ते रोज पिणे देखील चुकीचे आहे. त्याने शरीराचे नुकसान होऊ शकते.
5 / 5
चारकोल टूथपेस्ट : आता लोकांनी चारकोल (कोळसा) टूथपेस्ट वापरणे सुरू केले आहे, कारण ते टॉक्सिन्स काढण्यास प्रभावी ठरते. मात्र डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, ही पद्धत तुम्हाला अडचणीत आणू शकते. मात्र तुम्हाला तुमचे दात स्वच्छ ठेवण्यासाछी त्याचा वापर करायचाच असेल, तर आठवड्यातून केवळ दोनदा ही पेस्ट वापरावी.