Photo Gallery : पालांवरचा पाडवा, ऊसाच्या फडात गुढी अन् ऊसतोड मजुरांचा उत्साह गगणाला भिडणारा
नांदेड : सबंध राज्यात मराठी नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जात आहे. शहरी भागात ढोल-ताशांचा गजर, मोटार सायकलची रॅली अशा एक ना अनेक कार्यक्रमातून या नववर्षाचे स्वागत केले जात आहे. पण हा सर्व झगमगाट असावाच असे काही नाही याची बोलकी चित्र ही ऊसतोड कामगारांचा गुढी पाडवा पाहिल्यावर लक्षात येते. सणोत्सावासाठी झगमगटापेक्षा मनातला उत्साह किती महत्वाचा आहे याचा प्रत्यय नांदेडमधील ऊसतोड कामगारांकडे पाहून येतो. सकाळच्या प्रहरी पालांसमोर आकर्षक रांगोळी, गुढी उभारण्यासाठी ऊसतोड मजुरांची लगबग आणि गुढीची विधिवत पूजा यावरुनच सणाचा उत्साह काय असतो याचे दर्शन घडून येते.
Non Stop LIVE Update
Most Read Stories