महाराष्ट्रातील सर्वांत लहान, सर्वांत निसर्गरम्य हिल स्टेशन; एकदा तरी भेट द्या!

| Updated on: Jan 24, 2024 | 12:25 PM

वीकेंडला जवळच्या जवळ निसर्गरम्य ठिकाणी फिरायची इच्छा असेल तर महाराष्ट्रातील या सर्वांत लहान हिल स्टेशनला एकदा तरी आवर्जून भेट द्या. इथलं रम्य वातावरण आणि निसर्गरम्य पाहून तुमचं मन ताजंतवानं होईल. विशेष म्हणजे या हिल स्टेशनवर वाहनांना परवानगी नाही.

1 / 5
महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या सह्याद्रीच्या डोंगररांगेत स्थित असलेलं एक लहान ऑफबीट हिल स्टेशन म्हणजे माथेरान. ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी ह्यूग मालेट यांनी 1850 साली हे ठिकाण विकसित केलं होतं. याठिकाणी मुंबई आणि पुण्यातील पर्यटक वीकेंड ट्रिपसाठी आवर्जून येतात.

2 / 5
माथेरानमध्ये कोणत्याही वाहनाला परवानगी नाही. या हिल स्टेशनचं वातावरण प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना माथेरान पायी किंवा घोड्यावर फिरावं लागतं. मात्र इथल्या निसर्गसौंदर्याने पर्यटकांचं मन अत्यंत ताजंतवानं होतं.

3 / 5
याठिकाणी फिरण्यासाठी टॉय ट्रेनचीही व्यवस्था आहे. 1907 मध्ये सर आदमजी पीरभॉय यांनी नेरळ ते माथेरान ही टॉय ट्रेन बांधली होती. काही तांत्रिक बाबींमुळे ही टॉय ट्रेन 2016 मध्ये तात्पुरती बंद होती. मात्र जानेवारी 2018 मध्ये ती पुन्हा सुरू करण्यात आली.

4 / 5
माथेरान हे भारतातील सर्वांत लहान हिल स्टेशन आहे. जवळपास 7 किमी क्षेत्रात पसरलेल्या माथेरानची लोकसंख्या फक्त 6000 इतकी आहे. महाबळेश्वरप्रमाणेच माथेरानसुद्धा अनेक पॉईंट्ससाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी 35 हून अधिक पॉईंट्स आहेत. जिथून माथेरानचं सुंदर दृश्य पहायला मिळतं.

5 / 5
माथेरानला जायचं असेल तर मुंबई आणि पुण्याहून नेरळ जंक्शनपर्यंत ट्रेन उपलब्ध आहेत. नेरळहून माथेरानला जाण्यासाठी टॉय ट्रेनची सेवा आहे. अनेक एक्स्प्रेस गाड्या कर्जत इथं थांबतात, तिथून माथेरानला जाण्यासाठी लोकल ट्रेनचा वापर करता येतो.