Photo Gallery : सरकार निर्णयाचे ‘असे’ हे स्वागत, जळगावात केळीच्या खोडाचे पूजन अन् जंगी मिरवणूक
जळगाव : जिल्ह्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, वातावरणातील बदलामुले केळी उत्पादक शेतकरी हा अडचणीत आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रतिकूल परस्थिती असताना राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. केळीला फळाचा दर्जा देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. याच निर्णयाचे स्वागत रावेलमध्ये वेगळ्या अंदाजात करण्यात आले आहे. येथील शेतकऱ्यांनी केळीच्या खोडाचे पूजन करुन केळीच्या पानाची शहरातून वाजत-गाजत जंगी मिरवणूक काढली आहे. सराकरच्या निर्णयाचे स्वागत केळी उत्पादकांनी वेगळ्या अंदाजात केले असून या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
Most Read Stories