Photo Gallery | वृक्षवेलींची हिरवी माया अन् पिवळ्या फुलांचा शालू, रखखत्या उन्हाळ्यात भुरळ घालणारं ‘वनराई’तलं घर पाहिलंय?
यवतमाळ : वाढत्या सिमेंट घराच्या जंगलामुळे निसर्गाचे सानिध्य लाभने तसे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे ना चिमण्यांचा किलबिलाट ना पक्षांची ये-जा. नैसर्गिक वातावरण लाभणे तसे सध्याच्या जमान्यात मुश्किल झाले आहे. पण घरच निसर्गिक बाबींनी समृध्द केले तर. संपूर्ण घराला वेलींचे अच्छादन, गेटवर फुलांचा शालू अन् भर उन्हाळ्यात या सर्व गोष्टींचा सहवास. नुसती कल्पना करुनच मनाला गारवा मिळाला ना. पण आम्ही तुम्हाला असे घर दाखविणार आहोत जे भर उन्हाळ्यात तुम्हाला भुरळ घालेल. हे आहे यवतमाळच्या पुसद येथील प्रा. सुरेखा खाडे यांचे वनराईतले घर. वनराई हे केवळ घराचे नावच नाही तर प्रत्यक्षात वनराईत गेलेलाच अनुभव येईल असे घर आहे.
Most Read Stories