सोशल मीडियावर शोककळा, वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी टिकटॉक स्टारचं निधन, नक्की काय झालं
Follow us
टिकटॉक स्टार जेहन थॉमस ही चांगलीच लोकप्रिय होती. तिचे लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर तिचा चांगलाच दरारा असायचा. पण, याच प्रसिद्ध टिकटॉकर जेहन थॉमसचं निधन झालं आहे. झेहनच्या मृत्यूबाबत तिचा खास मित्र Alyx Reast ने माहिती दिली आहे. Alyx ने शुक्रवारी GoFundMe या पेजवरून ही बातमी शेअर केली आहे. त्याने ही बातमी शेअर करताच जेहनच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी जेहनने अखेरचा श्वास घेतला. मात्र, तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, जेहन गेल्या काही दिवसांपासून माईग्रेन या आजाराचा सामना करत होती. या आजाराशी झुंज देत असतानाच जेहनचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
काही आठवड्यांपूर्वी, जेहनने तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर शेअर केली होते की तिला ऑप्टिक न्यूरिटिसचे निदान झाले आहे. जेहन थॉमस ज्या आजाराशी झुंज देत होती, त्यामध्ये तिच्या डोळ्यांच्या ऑप्टिक नर्व्हमध्ये सूज होती. 5 मार्च रोजी तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून आपल्या आजाराबद्दल सांगितले होते.
दुःखद गोष्ट म्हणजे जेहनच्या मृत्यूनंतर तिचे कुटुंब एकाकी झाले आहे. GoFundMe ने तिच्या मृत्यूबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिची दोन्ही मुले, आयझॅक आणि एलिया यांचा उल्लेख आहे.
जेहनचा हा अकाली मृत्यू होता, ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती.