कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उंचवणाऱ्या बबिता कुमारी फोगाटचा आज 31 वा वाढदिवस आहे.
तिचा जन्म 20 नोव्हेंबर 1989 मध्ये हरियाणा येथे द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त पैलवान महावीर सिंह फोगाट यांच्या घरी झाला.
आमिर खानचा 'दंगल' सिनेमा याच कुटुंबावर आधारीत आहे.
बबितानं तिच्या आतापर्यंतच्या करियरमध्ये 7 पदकं जिंकली आहेत. त्यात 4 गोल्ड, 1 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ मेडल आहेत.
2015 मध्ये तिला अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
बबिताच्या घरात पूर्वजांपासूनच कुस्तीची परंपरा आहे. मात्र तिची आई या करियरच्या विरोधात होती.
मात्र बबिताच्या वडिलांनी त्यांना समजावून मुलींना कुस्तीच्या मैदानात उतरवलं.