Photos : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टोकियोत ऑलम्पिकचं आयोजन, प्रेक्षकांच्या उपस्थितीवर निर्णय बाकी
मागील वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलम्पिक स्पर्धा पुढील वर्षी जुलैपर्यंत स्थगित करण्यात आल्या होत्या. मागील वर्षी 21 जुलैपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धा आता 23 जुलै 2021 पासून सुरु होणार आहेत.

ऑलम्पिकच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं, "या स्पर्धांमधील 4 स्पर्धांमध्ये परदेशातून खेळाडू येतील. यात जलतरणपटू, जिमनास्ट, डायव्हिंग आणि व्हॉलीबॉल या स्पर्धांचा समावेश आहे.
- या स्पर्धांची घोषणा झाली त्याच दिवशी टोकिओ शहरात एका दिवसात 570 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.