हिरो एचएफ डिलक्स गाडी किंमत 61,232 रुपयांपासून सुरु होते. यात 97.2 सीसी इंजिन आहे. हे इंजिन 8.02 पीएस पॉवर आणि 8.05 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ही बाइक 70 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे.
बजाज सीटी 110 एक्स गाडीची किंमत 67,322 रुपयांपासून सुरु होते. यात 115.45 सीसी इंजिन आहे. हे इंजिन 8.6 पीएस पॉवर आणि 9.81 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. बाइक 70 किमी प्रति लिटर मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे.
बजाज प्लाटिना 110 ची सुरुवातीची किंमत 68,544 रुपये इतकी आहे. यात 115.45 सीसी इंजिन आहे. हे इंजिन 8.60 पीएस पॉवर आणि 9.81 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. बाइक 70 किमी प्रति लिटर मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे.
होंडा सीडी 110 ड्रिमची सुरुवातीची किंमत 71,133 रुपये आहे. यात 109.51 सीसी इंजिन आहे. हे इंजिन 8.79 पीएस पॉवर आणि 9.30 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. बाइक 65किमी प्रति लिटर मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे.
होंडा एसपी 125 ची किंमत 84,204 रुपयांपासून सुरु होते. यात 123.94 सीसी इंजिन आहे. हे इंजिन 10.8 पीएस पॉवर आणि 10.9 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. बाइक 65 किमी प्रति लिटर मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे.