
तौक्ते चक्रीवादळाचा गोव्याला मोठा फटका बसला आहे. या वादळामुळे गोव्याची दाणादाण उडाली असून कर्नाटकात चौघांचा मृत्यू झाला आहे.

गोव्यातही चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. पणजीमध्ये चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका पाहायला मिळाला आहे.

चक्रीवादळामुळे गोव्यात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत.

अजूनही गोव्यात सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तर गुजरातमध्ये एनडीआरएफची टीम सज्ज करण्यात आली आहे. एकूण 24 टीम बचत कार्यालाठी सज्ज झाल्या आहेत.

यातील 13 टीम या बाहेरुन मागवण्यात आल्या आहेत.