Photo : निलंग्यात परंपरा कायम, छत्रपती शिवाजी महाराज यांचे 11 स्क्वेअर फुटाच्या तेल चित्राने वेधले लक्ष
निलंगा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यंदाही कोरोनामुळे निर्बंध असले तरी उत्साहामध्ये मावळ्यांनी कुठेही कसर सोडलेली नाही. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील अक्का फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी वेगळा उपक्रम सादर केला जातो. यंदाही तीच परंपरा कायम ठेवत निलंगा येथे 11 हजार स्क्वेअर फुटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच तैल चित्र साकारण्यात आलं आहे. शिवाय शिवप्रमींना हा आकर्षक देखावा पाहता यावा म्हणून परिसरात स्क्रीन उभारण्यात आले आहेत. निलंगा शहरालगतच्या भागातच हे चित्र रेखाटले असले आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
Most Read Stories