Photos : मुंबईत पालकच झाले विद्यार्थी, वारंवार सूचनांच्या भडीमारात चित्र काढताना दमछाक
ओवी समृद्ध पालकत्वाची या उपक्रमांतर्गत मुंबईत पालकांचं विशेष प्रशिक्षण घेण्यात आलं.
Follow us
सध्या ओवी समृद्ध पालकत्वाची या उपक्रमांतर्गत मुंबईत पालकांचं विशेष प्रशिक्षण घेण्यात आलं. यात मुलं एखादी कृती करत असताना पालक म्हणून आपण सतत सूचना दिल्यावर मुलांमध्ये निर्माण होणारी शिक्षणातली नकारात्मक भावना कशी तयार होते आणि त्याचा मुलाच्या शिकण्यावर कसा परिणाम होतो याचा अनुभव चित्रकलेच्या मार्फत पालकांना दिला गेला. पालक चित्र काढत असताना त्यांना नकारात्मक सूचना दिल्यामुळे त्यांना चित्र काढण्यात मजा येत नव्हती. आपण चित्र काढू शकणार नाही ही भावना निर्माण झाली आणि त्यातून आपण मुलांना सतत सूचना दिल्यावर मुलं कोणत्या मानसिक परिस्थितीतून जात असतील याची जाणीव पालकांना झाली.
चित्र या उपक्रमातून ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीचा समजून घेताना पालक. पारंपरिक शिक्षण पद्धतीत सर्व मुलं ही एकाच साचेबद्ध पद्धतीने शिक्षण घेतात, पण मुलांना शिकण्यासाठी स्वतंत्र अवकाश दिला तर मुलांच्या कल्पकतेला चालना मिळतेच आणि सर्जशीलता वाढीस लागते.
बालसंगोपनात बाबा पालक यांचं महत्व पटवून देताना धम्मानंद. बालसंगोपन ही केवळ आईची जबाबदारी नसून बाबाची भूमिका ही तितकीच महत्वाची आहे. मूल हे दोघांचं असल्याने दोन्ही पालकांचा तितकाच सहवास आणि प्रेम मिळाले तर मुलांमध्ये भावनिक विकास चांगला होतो आणि शिकण्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
मुलांविषबालशिक्षणात गाणी आणि गोष्टींचे महत्व समजावत असतानाच प्रत्यक्ष अभिनय स्वरूपात पालकांना ही त्याचा अनुभव देताना.यी केवळ अपेक्षांचं ओझं न बाळगता आपलं मुलं जस आहे तसा त्याचा स्वीकार करायला हवा. एक मूल म्हणून व्यक्ती म्हणून त्याचा आदर करणे ही आपली सुद्धा जबाबदारी आहे. यातून मुलांच्या चांगल्या स्वप्रतिमा विकसित व्हायला मदत होते. यातून मूल कसं शिकतं हे समजून घेताना पालक.
या उपक्रमाबद्दल उपस्थित पालकांपैकी समृद्धी गमरे म्हणतात, “पालक म्हणून मुलांसोबत संवाद साधताना त्यांना आजूबाजूच्या परिसरातून ,घरगुती वातावरणातून त्याचे संगोपन आपण घडवू शकतो. मुलांना शिकवण्यासाठी विकतचे साहित्य न वापरता घरातील साहित्याचा वापर करून अंक, रंग, मोजमाप, वर्गीकरण यासारखे अनेक उपक्रम घेऊ शकतो ही माहिती मिळाली. याआधी आशा कल्पना सुचल्या नव्हत्या.” टीव्ही मोबाईल चे वेड कमी करण्यासाठी एखादी कार्यशाळा घेण्यात यावी अशी सूचना पालकांमार्फत आली.
पालकत्व निभावताना येणारा ताण कमी करण्यासाठी मुले आणि पालक यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करणारी आणि मूल समजून घ्यायला मदत करणारी कृतीयुक्त, अनुभवसंपन्न अशी ही कार्यशाळा होती. कार्यशाळेला काही पुरुष पालक ही उत्साहाने सहभागी होते.