केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे डाळिंब
डाळिंबा टॅनिंग दूर करण्यास आणि सनबर्नपासून संरक्षण करतं.
डाळिंबामध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात. त्यामुळे त्वचेवरील मुरुमांविरूद्ध लढण्याची क्षमता निर्माण होते. मुरुम रोखण्यासाठी डाळिंब उपयुक्त आहे.
डाळिंबाच्या बियांपासून तुम्ही फेस मास्क बनवू शकता. यासाठी तुम्हाला डाळिंबाच्या बिया बारीक कराव्या लागतील. त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करुन ती पेस्ट बनवू शकता. 10 ते 15 मिनिटांसाठी ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.
आपण डाळिंबाचा रस आणि व्हिनेगर चेहऱ्यावर लावू शकता. असं केल्यास चेहऱ्यावरील चमक वाढते. तसेच त्वचा संबंधित अनेक समस्या दूर होतात.