Marathi News Photo gallery Try these amazing tips to clean makeup accessories and product like lipstick face powder brush to avoid skin side effects
मेकअप ॲक्सेसरीजची स्वच्छताही महत्वाची, या उपायांनी करा साफ, साईड इफेक्टसपासूनही वाचाल
बरेच लोक वारंवार मेकअप करतात. ज्यामुळे मेकअप प्रॉडक्ट्स आणि मेकअप ॲक्सेसरीजचाही नियमित वापर केला जातो. अशा वेळी हायजीन राखण्यासाठी त्यांची स्वच्छताही महत्वाची ठरते. त्यामुळ त्वचेचे कोणतेही नुकसान अथवा साईड -इफेक्ट्स होण्यापासून रोखता येतात.
1 / 5
फेस पावडरचा सतत वापर केल्याने ती अस्वच्छ होते. अशा वेळी ती स्वच्छ करण्यासाठी, पॅलेटवर थोडेसे सॅनिटायझर फवारावे. नंतर कापसाच्या बोळ्याच्या मदतीने पॅलेट्स स्वच्छ करा. नंतर थोडा वेळ हवेवर वाळ द्या, जेणेकरून ते व्यवस्थित कोरडे होईल.
2 / 5
लिपस्टिक पेन्सिल, आयब्रो पेन्सिल, काजल आणि आय लाइनर पेन्सिलचाही मेकअपमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्या स्वच्छ करण्यासाठी, एका ग्लासमध्ये अल्कोहोल घ्या. नंतर त्यात सर्व पेन्सिल तसेच शार्पनर बुडवून दोन मिनिटे राहू द्या. मग ते कापसाच्या पॅडने स्वच्छ करा आणि काही काळ कोरडे होण्यासाठी ठेवा.
3 / 5
लिक्विड फाउंडेशन स्वच्छ करणे देखील खूप महत्वाचे आहे. यासाठी अल्कोहोल किंवा सॅनिटायझरमध्ये स्पंज किंवा कॉटन पॅडचा तुकडा भिजवा. त्यानंतर लिक्विड फाउंडेशनची बाटली आणि त्याचे नोझल नीट स्वच्छ करा. तसेच, तुम्हाला हवे असल्यास, संपूर्ण मेकअप किट देखील स्वच्छ करा. यातूनही स्वच्छता राखता येते.
4 / 5
लिपस्टिक साफ करण्यासाठी तुम्ही आयसोप्रोपाइल अल्कोहोलची मदत घेऊ शकता. यासाठी स्प्रे बाटलीत आयसोप्रोपील अल्कोहोल टाकून लिपस्टिकवर स्प्रे करा. नंतर कॉटन पॅड वापरून हलक्या हातांनी लिपस्टिक पुसून टाका. याच्या मदतीने तुम्ही त्वचेवर होणाऱ्या दुष्परिणामांपासून वाचाल.
5 / 5
सततच्या वापरामुळे मेकअप ब्रश आणि ब्लेंडरही खूप घाण होतात. त्यांना स्वच्छ करण्यासाठी, एका ग्लासमध्ये अल्कोहोल घ्या. आता ब्रश आणि ब्लेंडर त्यात काही वेळ भिजवा. नंतर हलके चोळून स्वच्छ करा. जर अल्कोहोल उपलब्ध नसेल तर तुम्ही पाणी देखील वापरू शकता.