खराब जीवनशैली आणि अनारोग्यकारक आहार यांचा वाईट परिणाम त्वचेवरही अनेक वेळा दिसून येतो. यामुळे त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत काही टिप्सचा अवलंब करून तसेच तुमच्या काही सवयी बदलून तुम्ही निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवू शकता.
तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करा. हे तुमच्या त्वचेला हानिकारक अतिनील किरणांपासून वाचवण्यास मदत करतील. सनस्क्रीन त्वचेला टॅनिंगपासून वाचवण्याचे काम करते.
धूम्रपान शरीरासाठी तसेच त्वचेसाठीही अतिशय हानिकारक असते. धूम्रपान केल्याने तुमची त्वचा म्हातारी दिसते. चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसतात. धूम्रपानामुळे रक्त प्रवाह कमी होतो. त्यामुळे त्वचेवर पिवळसरपणा दिसू लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही धूम्रपान सोडणे महत्त्वाचे आहे. यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकजण तणावाखाली असतात. ताण घेतल्याने तुमच्या त्वचेवरही खूप वाईट परिणाम होतो. मुरुम किंवा त्वचेशी संबंधित इतर समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे चांगली झोप घ्या. कमी ताण घ्या.
आजकाल सर्वांच वेळापत्रक एवढे बिझी असते की नीट बसून जेवायलाही वेळ मिळत नाही. पण चांगली त्वचा हवी असेल तर बाहेरील उपायांप्रमाणेच आतूनही पोषण मिळणे गरजेचे असते. त्यासाठी गरज असते सकस आणि पौष्टिक आहाराची. सकाळी पोटभर ब्रेकफास्ट व दुपारी आणि रात्री चांगले , सकस जेवण करणे, पुरेसे पाणी पिणे यामुळे केवळ तुमची तब्येतच चांगली रहात नाही तर तुमच्या त्वचेवरही त्याचा चांगला प्रभाव दिसून येतो.