अभिनेत्री प्रियांका चोप्राने 20 वर्षांपूर्वी मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. 2000 मध्ये प्रियांका मिस वर्ल्ड ठरली होती. याच दिवसाची आठवण म्हणून तिनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये तिनं मिस वर्ल्डचा किताब मिळवल्यानंतरचा आनंद व्यक्त केला आहे.
'मिस वर्ल्ड 2000... मी त्यावेळी 18 वर्षांची होते आणि मी मिस वर्ल्ड ठरले, मंचावरील गर्दीनंतर जेव्हा मी माझ्या आई-वडिलांना भेटले तेव्हा आईनं मला प्रश्न केला, आता तुझ्या अभ्यासाचं काय...? ' असं कॅप्शन प्रियांकानं या पोस्टला दिलं आहे.
या व्हिडिओमध्ये प्रियांका भावूक झालेली दिसली.
20 वर्षांनंतर प्रियांका आणि तिची आई मधू चोपडा एका काउचवर बसून त्या दिवसाबद्दल बोलताना दिसत आहेत
मिस वर्ल्ड ठरल्यानंतर आईची रिअॅक्शनही तिनं या पोस्टसोबत शेअर केली आहे.