भारतीय बाजारपेठेत दुचाकींना चांगली मागणी आहे. या आर्थिक वर्षातही अनेक दुचाकींनी बाजारात धुमाकूळ घातला. चला तर मग जाणून घ्या या आर्थिक वर्षात विक्री झालेल्या टॉप 5 दुचाकी वाहनांबद्दल...
Hero Splendor ने या आर्थिक वर्षात बाजी मारली आहे, ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी दुचाकी ठरली आहे. कंपनीने या आर्थिक वर्षात एकूण 24,60,248 वाहनांची विक्री केली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत 7% कमी आहे.
या आर्थिक वर्षात Honda Activa दुसर्या क्रमांकावर आहे. कंपनीने या स्कूटरच्या 19,39,640 युनिट्सची विक्री केली आहे. मागील वर्षापेक्षा ही आकडेवारी 25% कमी आहे.
Hero Hf Deluxe हिरो मोटोकॉर्पच्या पोर्टफोलिओमधील सर्वात स्वस्त मॉडेल आहे. या आर्थिक वर्षात या बाईकच्या एकूण 16,61,272 युनिट्सची विक्री झाली आहे. ही विक्री मागील वर्षाच्या तुलनेत 19% कमी आहे.
होंडाने आपल्या Honda Shine बाइकच्या एकूण 9,88,201 युनिट्सची विक्री केली आहे. ही विक्री मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 4 टक्क्यांनी जास्त आहे.
बजाज ऑटोची स्पोर्टस् बाईक बजाज पल्सर (Bajaj Pulsar) या आर्थिक वर्षात अव्वल कामगिरी करणार्या मोटारसायकलींच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. या सिरीजमधील बाईक्सच्या एकूण 9,45,978 युनिट्सची विक्री झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही विक्री 11% जास्त आहे.